26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रदरेकर यांना पुन्हा नोटीस

दरेकर यांना पुन्हा नोटीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी दुस-यांदा नोटीस पाठवली आहे. माता रमाबाई आंबेडकर पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्याची सूचना दरेकर यांना नोटिसीतून दिली गेली आहे. ११ एप्रिल रोजी पुन्हा एकदा पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहा, असे आदेश नोटिसीमधून देण्यात आले आहेत. मुंबै बँक बनावट मजूर प्रकरणात ही नोटीस दिली गेली आहे.

आठवड्याभरापूर्वी प्रवीण दरेकर यांची माता रमाबाई आंबेडकरनगर पोलिस स्टेशनमध्ये मुंबै बँक बनावट मजूर प्रकरणात चौकशी झाली होती. जवळपास चार ते पाच तास पोलिसांनी प्रवीण दरेकर यांची चौकशी केली होती. त्यावेळी गरज लागल्यास पुन्हा बोलविण्यात येईल, असे पोलिसांनी दरेकरांना सांगितले होते. दरेकरांनीही पोलिसांचे म्हणणे मान्य केले होते. आता ११ तारखेला पोलिसांच्या नोटिसीनुसार दरेकरांना पुन्हा चौकशीसाठी जावे लागणार आहे. न्यायालयात सरकारी पक्षाच्या बाजूने अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी बाजू मांडली तर सदावर्ते यांचे वकील अ‍ॅड. महेश वासवानी यांनी घरत यांना जोरदार टक्कर दिली.

आठवडाभरापूर्वीच दरेकरांची चौकशी
मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात प्रवीण दरेकर यांची ४ एप्रि रोजी मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे चार तास चौकशी करण्यात आली होती. यादरम्यान त्यांना विविध प्रश्न विचारले गेले. चौकशी संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी चौकशीदरम्यान पोलिसांनी नियबा प्रश्न विचारल्याचा आरोप केला. तसेच सरकारचा पोलिस अधिका-यांवर दबाव असल्याचेही ते म्हणाले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या