27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रदसरा मेळावाही एकनाथ शिंदे यांचाच होणार

दसरा मेळावाही एकनाथ शिंदे यांचाच होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : यंदाचा शिवसेना मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारणही तसेच आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट तयार झाले आहेत. शिवसेना कुणाची हा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे

. मात्र न्यायालयाबाहेर शिवसेना कुणाची ही लढाई सुरूच आहे. दरवर्षीप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा होणार… पण तो नेमका कुणाच्या नेतृत्वात होणार…? हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. नारायण राणे यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचे सांगितले आहे. तसेच यंदाचा दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात होणार असल्याचेही सांगितले.

महाराष्ट्रात ठाकरेंचा वारस म्हणजे शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाही, बाळासाहेबांचे काय गुण आहेत? जे घडले ते योग्य घडले. मी पण बंड केले होते. बंड करण्यामागे खूप कारणे आहेत. ते करावं लागतं, जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही त्याला काय करणार? खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे. दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेंचाच होणार, उद्धव ठाकरेंना विचार द्यायला काय आहे, त्यांच्याकडे कोणते विचार आहेत? ते काय बोलणार? त्यामुळे एकनाथ शिंदे यांचाच मेळावा होणार असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रावरचे विघ्न दूर झाले आहे, गेली अडीच वर्षे महाराष्ट्रावर संकट आले होते. पण आता ते नाही. हे सरकार चांगले काम करत आहे. एकनाथ शिंदेंच्या मागे लागू नका. ते एकदिवस सगळे काढतील. त्यांच्याकडे नगरविकास खाते होते, त्यांना डिवचू नका. सगळे आहे त्यांच्याकडे, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या