22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रदहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्य मंडळाने मार्च-एप्रिलमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट, तर बारावीची परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होईल. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा आणि श्रेणी सुधारू इच्छिणा-या श्रेणी सुधार परीक्षा घेतली जाते. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाने पुरवणी आणि श्रेणी सुधार परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० जूनपासून सुरू केली आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २० जूनपासून सुरू करण्यात येणार आहे.
राज्य मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची सर्वसाधारण आणि द्विलक्षी विषयांची पुरवणी परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट, बारावीची व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा २१ जुलै ते ८ ऑगस्ट आणि दहावीची पुरवणी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होईल. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जुलै ते ८ ऑगस्ट, तर दहावीची प्रात्यक्षित, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २६ जुलै ते ८ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या