16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रदांडिया दरम्यान शॉक लागून डीजे ऑपरेटरचा मृत्यू

दांडिया दरम्यान शॉक लागून डीजे ऑपरेटरचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिकच्या दांडिया महोत्सवासह दसरा सणाला गालबोट लागले असून दांडिया ऐन रंगात आला असताना इलेक्ट्रिक शॉक लागल्याने डीजे ऑपरेटरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पप्पू बेंडकुळे असे डीजे ऑपरेटरचे नाव असून काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दसरा नाशिककर साजरा करत आहेत. दरम्यान गेल्या नऊ दिवसांपासून शहरात गरबा-दांडियाने चार चांद लावले आहेत.

काल सायंकाळच्या सुमारास आडगाव परिसरात दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऐन उत्साहात दांडिया सुरू असताना डीजे ऑपरेटरला विजेचा धक्का लागला. यात डीजे ऑपरेटरचा मृत्यू झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या