22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeक्रीडादिग्गज फुटबॉलपटू मेस्सीने रचला इतिहास

दिग्गज फुटबॉलपटू मेस्सीने रचला इतिहास

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे फुटबॉल विश्वातील सर्वांत मोठे प्रतिस्पर्धी मानले जातात. अर्जेंटिनाचा मेस्सी आता एका कामगिरीत रोनाल्डोपेक्षा सरस ठरला आहे. मेस्सीने विक्रमी बलोन डी’ओर पुरस्कार पटकावला आहे. ३४ वर्षीय मेस्सीच्या नावावर आता ७ पुरस्कार असून ३६ वर्षीय रोनाल्डोने हा मान पाचवेळा जिंकला आहे. मेस्सीला हा पुरस्कार मिळताच मेस्सीच्या चाहत्यांनी रोनाल्डोला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मेस्सीने बार्सिलोनासह गेल्या मोसमात चमकदार कामगिरी केली आणि अर्जेंटिनासह पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले. ३४ वर्षीय मेस्सीच्या बळावर अर्जेंटिनाने जुलैमध्ये कोपा अमेरिकाचे विजेतेपद पटकावले होते. मेस्सी अनेकदा मैदानावर खेळून आपली छाप सोडतो. पुरस्कार जिंकल्यानंतर मेस्सी म्हणाला, ‘‘मी खूप आनंदी आहे. नवनवीन जेतेपदांसाठी लढत राहणे चांगले वाटते.’’

मेस्सी म्हणाला, अजून किती वर्षे बाकी आहेत माहीत नाही, पण खूप वेळ आहे अशी आशा आहे. मी बार्सिलोना आणि अर्जेंटिनातील सर्व सहकारी खेळाडूंचे आभार मानू इच्छितो. मेस्सीचे ६१३ गुण होते, तर पोलंडचा स्ट्रायकर रॉबर्ट लेवांडोस्की ५८० गुणांसह दुस-या स्थानावर आहे. त्याच वेळी, महिला विभागात, अलेक्सिया पुतेलासने बार्सिलोना आणि स्पेनसाठी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पुरस्कार जिंकला. तर ख्रिस्तियानो रोनाल्डो या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या