36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीच्या गाझीपूरात आढळली स्फोटकांची बॅग

दिल्लीच्या गाझीपूरात आढळली स्फोटकांची बॅग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : येथील गाझीपूर इथल्या फूल बाजारात स्फोटकांनी भरलेली बॅग आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. दिल्ली पोलिसांनी ही स्फोटके जप्त केली आहेत. त्याचबरोबर ही बॅग आढळलेला परिसर रिकामा करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांनी बॅग जप्त करून घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅग जप्त केल्यानंतर बॉम्ब निकामी करणा-या पोलिसांच्या पथकाला गाझीपूर फूल बाजारात पाठवण्यात आले. अग्निशमन दलाच्या काही गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्पेशल सेलचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, नॅशनल सिक्युरिटी गार्ड या दहशतवादविरोधी दलालाही घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. पूर्व दिल्लीतल्या गाझीपूर फूल बाजारात एक बेवारस बॅग आढळून आली होती.

या बॅगबद्दलची प्राथमिक माहिती पोलिसांना देण्यात आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी बॅग आढळलेला परिसर रिकामा केला आणि बॉम्ब निकामी करणा-या पथकाला घटनास्थळी बोलावून घेतले. हे पथक आल्यानंतर त्यांनी जेसीबी मागवून एक खोल खड्डा खणून बॉम्ब निकामी केल्याची माहिती मिळाली आहे. हा बॉम्ब फुटल्यानंतर झालेल्या स्फोटाचा व्हीडीओही हाती येत आहे. त्यावरून हा बॉम्ब प्रचंड मोठ्या क्षमतेचा होता हे सिद्ध होत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्फोटक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या