27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयदिल्ली, काश्मिरात आयईडी, पंजाबमध्ये आरडीएक्स जप्त

दिल्ली, काश्मिरात आयईडी, पंजाबमध्ये आरडीएक्स जप्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सुरक्षा जवानांनी शुक्रवारी राजधानी दिल्ली आणि जम्मू-काश्मिरात आयईडी आणि पंजाबमध्ये आरडीएक्सचा मोठा साठा जप्त करीत प्रजासत्ताक दिनापूर्वी (२६ जानेवारी) स्फोट घडवून आणून देशाला हादरवण्याचा कट उधळून लावला. पूर्व दिल्लीतील गाझीपूर फूल मंडईत आयईडीचा साठा सापडला. बॉम्बविरोधी पथकाने तो निकामी केल्याने मोठा कट उधळला गेला. तसेच काश्मिरातील श्रीनगरमधील ख्वाजा बाजार येथेही आयईडी स्फोटके जप्त करण्यात आली, तर पंजाबमध्येही गुरुदासपूरच्या लखनपाल गावात ५ किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले. त्यामुळे मोठा कट उधळला गेला.

नवी दिल्लीतील गाझीपूरच्या फूल बाजारात स्फोटकांनी भरलेली बॅग आढळली. दिल्ली पोलिसांनी ही स्फोटके जप्त केली. त्यानंतर बॅग आढळलेला परिसर रिकामा करण्यात आला. तेथे बॉम्ब निकामी करणारे पथक दाखल होताच त्यांनी जीसीबीच्या सहायाने एक मोठा खड्डा खोदून त्या खड्ड्यात बॉम्ब निकामी केला. या स्फोटाची तीव्रता पाहता स्फोटके प्रचंड क्षमतेचे असल्याचे आढळून आले. यावेळी अग्निशमन दलाच्या गाड्या, स्पेशल सेलचे अधिकारी, नॅशनल सिक्युरिटी गार्ड या दहशतवादविरोधी दलही घटनास्थळी दाखल झाले होते.

यासोबतच जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील ख्वाजा बाजार भागात प्रेशर कुकर बॉम्ब जप्त करण्यात आला. प्रेशर कुकरमध्ये आयईडी लावण्यात आले होते. हे कुकर एका बॅगमध्ये ठेवण्यात आले होते. अतिरेक्यांचा हा कट उघडकीस येताच बॉम्बविरोधी पथकाने कुकर बॉम्ब नष्ट केला. त्यामुळे काश्मिरातील अतिरेक्याचा कटही उधळला गेला.
दरम्यान, पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ५ किलो आरडीएक्स सापडले. पाकिस्तानात बसलेल्या इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचा (आयएसवायएफ) दहशतवादी लखबीर रोडे याने याचा पुरवठा केला.

पंजाब पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ६ आयएसवायएफ दहशतवाद्यांना अटक केली होती. भारत-पाकिस्तान सीमेनजीक गुरुदासपूरच्या लखनपाल गावातील अमनदीप कुमार उर्फ ​​मंत्री याच्या चौकशीत एका दहशतवाद्याकडे हे स्फोटक सापडले.आरडीएक्ससह एक डिटोनेटर, कोडेक्स वायर, ५ स्फोटक फ्यूज आणि वायर, एके ४७ चे १२ जिवंत काडतुसे जप्त केले. याच दहशतवादी संघटनेने पठाणकोटमधील आर्मी कॅन्टच्या गेटवर ग्रेनेड हल्ला केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जून-जुलै २०२१ मध्ये लखबीर रोडे, पाकिस्तानमध्ये बसून पंजाब आणि बाहेरील देशांमध्ये त्याच्या दहशतवादी मॉड्यूलद्वारे अनेक दहशतवादी घटना घडवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. त्याने आरडीएक्स, टिफिन बॉम्बसह मोठ्या प्रमाणात स्फोटके सीमेपलीकडून भारतात आणली आहेत. यासाठी ड्रोनचा विशेष वापर करण्यात आला आहे. त्यासाठी तो सीमापार तस्करीचे जाळेही वापरत होता.

आरडीएक्सद्वारे असेंबल
केले जाणार होते आयईडी
एसबीएस नगर एसएसपी कंवरदीप कौर यांनी अमनदीपच्या चौकशीनंतर लगेचच गुरदासपूर जिल्ह्यात पोलिसांचे पथक पाठवून स्फोटके जप्त केली. या स्फोटकातून आयईडी असेम्बल करायचे होते, असे अमनदीपने सांगितले. स्फोटकांची ही खेप त्याला पाकिस्तानमध्ये बसलेल्या लखबीर रोडे या दहशतवादी मॉड्यूलचा हँडलर शीख भिखारीवाल याने पाठवली होती, असेही तो म्हणाला.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या