मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोरोनाने शिरकाव केला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील तिघांना कोरोनाची लागण झाली. याच कारणामुळे मागील हंगामाप्रमाणे याही वर्षी आयपीएलचे उर्वरित सामने तात्पुरते रद्द केले जाणार का? असे विचारले जात आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील फिजिओथेरेपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांना सुरुवातीला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर दिल्ली संघाने पुणे प्रवास तात्पुरता रद्द करून क्वॉरंन्टाईन होण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या ताफ्यातील सर्वांचीच कोरोना चाचणी केल्यानंतर आणखी दोघांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये एक विदेशी खेळाडू, एका सपोर्ट टीमच्या सदस्याचा समावेश आहे.