27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयदेशभरात १.१२ लाख ४ जी टॉॅवर्स उभारणार

देशभरात १.१२ लाख ४ जी टॉॅवर्स उभारणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचे सरकारी टेलीकॉम नेटवर्क असलेले बीएसएनएल आता देशभरात आपले नेटवर्क उभे करण्यासाठी सज्ज आहे. बीएसएनएलने टाटा कंसल्टंसी सेवा या संस्थेसबत ५५० कोटी रुपयांचा करार केला आहे. या करारात ते भारतातील विविध भागांत आपले जवळपास ६००० टॉवर उभारणार आहेत आणि यामधून ग्राहकांना ४ जी सेवा पुरवली जाणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्री आश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली.

भारतभर बीएसएनएलचे जवळपास १ लाख १२ हजार टॉवर्स उभे करण्याचे लक्ष असून पहिल्या टप्प्यात ६००० टॉवर्स उभे करण्याचे काम टीसीएसला देण्यात आले असून, ५५० कोटी रुपये या टप्प्यात खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गुरुवारी या करारावर सह्या करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वेने प्रवास करतानासुद्धा ५जी नेटवर्क उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ताशी १०० किमी वेग असणा-या रेल्वेमध्ये ही सुविधा पुरविण्यात येणार आहे.

पूर्ण भारतीय बनावटीचे टेलिकॉम नेटवर्क
लोकसभेत पुढे बोलताना ते म्हणाले की, भारताच्या वैज्ञानिक आणि अभियंत्याच्या देखरेखेखाली बनवल्या जाणा-या पूर्ण भारतीय बनावटीचे टेलिकॉम नेटवर्क लवकरच आपल्या सेवेत येणार असल्याचे सांगण्यासाठी मला आनंद होत आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की पहिल्या टप्प्यात ६००० टॉवर यशस्वीपणे उभारले जातील आणि नंतरच्या टप्प्यात ६००० असे करुन १ लाख टॉवर उभारण्यात येणार आहेत. तसेच ५जी नेटवर्क स्थापित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकासही समांतरपणे करण्यात येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या