31.7 C
Latur
Friday, March 31, 2023
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस-पंकजा मुंडे एकाच कारमधून दाखल!

देवेंद्र फडणवीस-पंकजा मुंडे एकाच कारमधून दाखल!

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिकमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच कारमधून या बैठकीसाठी आले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये अंतर्गत वाद आहे, अशी नेहमीच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा असते. परंतु आज देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच कारमधून या कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित झाले. त्यामुळे या घटनेची सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा आहे.

नाशिकमध्ये दोन दिवसीय भाजप कार्यकारिणीची बैठक सुरू असून आजचा दुसरा दिवस आहे. यासाठी राज्यभरातून भाजपचे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित आहेत. यात देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांच्यासह पंकजा मुंडे देखील उपस्थित आहेत.

दरम्यान आज दुपारी कार्यक्रम स्थळी येत असताना देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे हे दोघेही एकाच गाडीतून बैठक स्थळी पोहोचले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावलेल्या कार्यक्रमांपासून पंकजा मुंडे जाणीवपूर्वक पाठ फिरवत असल्याचे देखील बोलले जात होते

तर देवेंद्र फडणवीस आगामी काळात बीडमध्ये पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी जिल्ह्यात नवे नेतृत्व उभे करण्याच्या तयारीत असल्याची कुजबूज सुरू झाली होती. या सर्व घडामोडींमुळे या चर्चांना उधाण आले होते. तर नाशिकमध्ये सुरू असलेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला दोघेही एकाच गाडीतून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

माझी गाडी मागे राहिली म्हणून… : पंकजा मुंडेंचा खुलासा
‘मी आणि देवेंद्रजी एकाच हॉटेलमध्ये रहायला होतो. त्यांची गाडी लागली होती, माझी गाडी मागे होती. त्यामुळेच मी त्यांच्या गाडीत बसून कार्यकारिणी बैठकीला आले असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाची कोअर कमिटी सदस्य म्हणून मी कार्यकारिणी बैठकीला उपस्थित होते. भाजपाची जी नियमानुसार कार्यकारिणी व्हायला पाहिजे होती, ती बाकी असल्याने ती आता होत आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या