कोलकाता : वृत्तसंस्था : कानून के दरबार में देर है पर अंधेर नही, असा एक डायलॉग तुम्ही चित्रपटांमध्ये एनेकवेळा एकला असेल. अशीच काहीशी स्थिती न्याय दरबारी प्रलंबीत असलेल्या एका खटल्याच्या निकालावरून सोमवारी सिद्ध झाले.एक दोन नव्हे तर गेल्या ७२ वर्षां पासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेला हा देशातील सर्वांत जुना खटला उच्च न्यायालयाच्या कोलकाता खंडपीठाने निकाली काढली. गेल्या आठवड्यात या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने निकाल सुनावला.
महत्त्वाची बाब म्हणजे, विद्यमान मुख्य न्या. प्रकाश श्रीवास्तव यांच्या जन्माच्या दशकभरापूर्वी बेरहामपूर बँकेशी संबंधित हा खटला दाखल झाला होता. त्यामुळे आता या खटल्याखेरीज आणखी सर्वांत जुन्या ५ प्रलंबित प्रकरणांपैकी ३ प्रकरणे अद्याप न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. या ३ प्रकरणांपैकी २ खटले दिवाणी आहेत. त्यातील एक बंगालमधील मालदा दिवाणी न्यायालयात, तर दुसरे मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तो निकाली काढण्यासाठी मालदा कोर्टाने नोव्हेंबरमध्ये शेवटची सुनावणी घेतली होती.
प्रकरण नेमके काय
बेरहामपूर खटला हा भारतीय न्यायालयात सुनावणी होणारा सर्वात जुना खटला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने १९ नोव्हेंबर १९४८ ला दिवाळखोरीत निघालेल्या बेरहामपूर बँक बंद करण्याचा आदेश दिला होता. याला आव्हान देणारी याचिका १ जानेवारी १९५१ ला दाखल करण्यात आली.
आतापर्यंत काय-काय झाले
कर्जवसूलीसाठी बेरहामपूर बँकेकडून दाखल खटल्यांना आव्हान देत कर्जदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. या लिक्विडेशनला आव्हान देणारी याचिका गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हायकोर्टात दोनदा सुनावणीसाठी आली. पण त्यावर एकही सुनावणी होऊ शकली नाही. न्या. कपूर यांनी न्यायालयाच्या लिक्विडेटरकडून अहवाल मागवला होता. १९ सप्टेंबर २०२२ ला सहाय्यक लिक्विडेटरने खंडपीठाला सांगितले, हे प्रकरण ऑगस्ट २००६ मध्येचे निकाली निघाले होते. मात्र त्याचा नोंदीमध्ये समावेश नसल्याने प्रकरण प्रलंबित यादीतच राहिले. त्यावर न्या. कपूर यांनी २३ ऑगस्ट २०२२ ला यावर शेवटची सुनावणी केली. यावेळी त्यांनी वकील आणि एका विशेष अधिका-याला पक्षकारांची भेट घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे मार्ग सुचवण्याचे निर्देश दिले होते.