22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयदेशातील १३ शहरांत ५ जी सेवा सुरू होणार

देशातील १३ शहरांत ५ जी सेवा सुरू होणार

एकमत ऑनलाईन

राज्यातील मुंबई, पुण्यात सर्वप्रथम सेवा
नवी दिल्ली : देशातील प्रमुख १३ शहरांमध्ये ५ जी इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २ शहरांचा समावेश आहे. त्यामध्ये मुंबई आणि पुण्याला सर्वप्रथम ही सेवा मिळणार आहे. ५ जी इंटरनेट सेवा सगळ््यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी भारत पुढाकार घेत आहे. या माध्यमातून सेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

काही दिवसांपूर्वीच ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला होता. रिलायन्स जिओने लिलावात ८८ हजार ०७८ कोटी रुपयांची बोली लावली, तर भारती एअरटेलने ४३,०८४ कोटी, व्होडाफोन आयडियाने १८ हजार ७९९ कोटी रुपयांची बोली लावली होती. ५ जी सेवादेखील ४ जी सेवेप्रमाणे टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.

पहिल्या टप्प्यात १३ शहरातून ५ जी सेवा सुरू होईल. अहमदाबाद, बेंगळुरू, चंदिगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम या शहरात ५ जी सेवा सुरू होईल. याशिवाय, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ या शहरांचाही समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यालाही लवकरच सेवा मिळणार आहे.

या अगोदर दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी ऑक्टोबरपर्यंत देशात सर्वत्र ५ जी सेवा सुरू होईल, असे घोषित केले आहे. त्यामुळे ५ जी सेवेची उत्सुकता लागली आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने आणि कंपन्यांनीही तयारी सुरू केली आहे.

रिलायन्स देणार
सर्वांत स्वस्त सेवा
देशातील सगळ््यात स्वस्त ५ जी इंटरनेट सेवा रिलायन्स जिओ देणार असल्याची घोषणा आकाश अंबानी यांनी केली आहे. त्यामुळे टॅरिफ वॉर होण्याची दाट शक्यता आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्वच कंपन्या नवनवे प्लॅन देतील, यातून ग्राहकांचा नक्कीच फायदा होईल, असे चित्र आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या