सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत १७३ टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
२००९ ते २०१९ या काळात सलग तीन वेळा खासदार झालेल्या ७१ नेत्यांच्या संपत्तीत सरासरी २८६ टक्के वाढ झाली. भाजपा खासदार रमेश चंदप्पा जिगाजिनागी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालातून ही माहिती समोर आली.
ज्या दहा खासदारांची संपत्ती सर्वाधिक वाढली त्यात भाजपच्या ६ खासदारांचा समावेश आहे. तर शिरोमणी अकाली दल, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजू जनता दल आणि ए. आय. यु. डी. एफच्या एका खासराचा समावेश आहे. या ७१ खासदारांची सरासरी संपत्ती २००९मध्ये ६.५१ कोटी रुपये होती. ती २०१९ मध्ये २८६ 286 टक्क्यांनी वाढली. त्यांची सरासरी संपत्ती आता १७.५९ कोटी रुपये झाली आहे. दहा वर्षात भाजपा खासदारांच्या संपत्तीत सरासरी ४२ पटीने वाढली.
सर्वाधिक वाढ जिगाजिनागी यांच्या संपत्तीत
कर्नाटकचे भाजपा खासदार जिगाजिनागी यांच्याकडे २००९ मध्ये १.१८ कोटींची संपत्ती होती. ती २०१४ मध्ये ८.९४ कोटी झाली. तर २०१९ मध्ये त्यात ४२ पटीने वाढत ५०.४१ कोटी झाली. निवडणुकीवेळी खासदारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या माहितीच्या आधारावर ही माहिती समोर आली आहे.
सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत १७३ टक्क्यांची वाढ
बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत १७३ टक्क्यांनी वाढ झाली. त्यांच्याकडे २००९मध्ये ५१.५३ कोटी रुपये संपत्ती होती. ती २०१९ मध्ये १७३ टक्क्यांनी वाढत १४०.८८ कोटी रुपये झाली. दहा वर्षात त्यांच्या संपत्तीत ८९.३५ कोटींची भर पडली. खासदार बदरूद्दीन अजमल यांच्या संपत्तीत १६० टक्क्यांनी वाढली. २००९ मध्ये त्यांची संपत्ती३० कोटी रुपये होती तर २०१९ मध्ये त्यांची संपत्ती 78 कोटी रुपये इतकी झाली.
हरसिमरत कौर बादल यांच्या संपत्तीत २६१ टक्क्यांनी वाढ
अकाली दलच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्या संपत्तीत २६१ टक्क्यांनी वाढ झाली. हरसिमरत कौर बादल यांच्याकडे २००९ मध्ये ६०.३१ कोटी रुपये होते. त्यात २०१९ मध्ये २१७.९९ कोटींची भर पडली. दहा वर्षात हरसिमरत कौर यांची संपत्ती १५७.६८ कोटी रुपयांनी वाढली आहे.
वरुण गांधींची संपत्ती ५ वरुन ६० कोटी
उत्तर प्रदेशमधून तिस-यांदा खासदार झालेले भाजप नेते वरुण गांधी यांच्या संपत्तीत ५ कोटींवरून ६०.३२ कोटींची वाढ झाली. २००९ मध्ये मेनका गांधी यांची संपत्ती १७ कोटी होती. जी २०१९ मध्ये ५५ कोटी झाली.
तिस-यांदा खासदार झालेले नेते कोण
लागोपाठ तीन वेळा खासदार झालेल्या नेत्यांमध्ये भाजपाचे सर्वाधिक ४३ खासदार आहेत. दहा वर्षात भाजपच्या या खासदारांची संपत्ती सरासरी १५ कोटी रुपयांची वाढ झाली. दुस-या क्रमांकाचा पक्ष काँग्रेस आहे. काँग्रेसच्या दहा खासरारांची संपत्ती सरासरी १० कोटी रुपयांनी वाढली. यामध्ये तृणमृल काँग्रेसचा तिसरा क्रमांक लागतो.७१ पैकी तृणमृल काँग्रेसचे सात खासदार आहेत. २००९ मध्ये तृणमूलच्या खासदारांची सरासरी संपत्त ७६ लाख रुपये होती… जी २०१९ मध्ये ५.९ कोटी रुपये झाली.