26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयदेशात तब्बल ४.७० कोटींवर खटले प्रलंबित

देशात तब्बल ४.७० कोटींवर खटले प्रलंबित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील विविध न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ही वाढ चिंतेची बाब आहे, असे सांगत केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी देशातील न्यायालयांमध्ये तब्बल ४.७० कोटींहून अधिक खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी ७०,१५४ प्रकरणे या वर्षी २ माचर्पंत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती, असे म्हटले.

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू शनिवारी छत्तीसगडच्या एकदिवसीय दौ-यावर होते. या दरम्यान त्यांनी नवा रायपूर, अटलनगर येथील रायपूर खंडपीठ संकुलातील आयकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या नवीन केंद्रीय सचिवालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले. त्यानिमित्त आयोजित उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी देशातील विविध न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांबाबत चिंता व्यक्त केली. या अगोदर या वर्षीच्या मार्चमध्ये केंद्र सरकारने लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली होती. देशातील विविध न्यायालयांमध्ये ४.७० कोटींहून अधिक खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी ७०,१५४ प्रकरणे या वर्षी २ मार्चपर्यंत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती. रिजिजू यांनी त्यांच्या लेखी उत्तरात २१ मार्चपर्यंत २५ उच्च न्यायालयांत ५८,९४,०६० खटले प्रलंबित असल्याचे सांगितले होते. अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबारमधील प्रलंबित खटल्यांचा डेटा नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिडकडे उपलब्ध नाही, असे ते म्हणाले होते.

यावेळी किरेने रिजिजू यांनी या प्रलंबित खटल्यांबद्दल रिजिजू यांनी चिंता व्यक्त केली. प्रलंबित प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचा अर्थ खटल्यांची सुनावणी होत नाही किंवा निकाली निघत नाही असा होत नाही, तर निकाली लागणा-या प्रकरणांपेक्षा नवीन प्रकरणांची संख्या जास्त आहे. मी कायदा मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा विविध न्यायालयांमध्ये सुमारे ४.५० कोटी खटले प्रलंबित होते. आता ही संख्या ४.५० कोटींहून अधिक झाली असून लवकरच ती ५ कोटींवर पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले.

नव्या खटल्याची संख्या दुप्पट
खटले वाढण्यामागे ते निकाली निघत नसल्याचे कारण नाही, तर ज्या प्रमाणात खटले निकाली निघत आहेत, त्याच्या तुलनेत नव्या प्रकरणाची संख्या दुप्पट आहे. उदाहरणार्थ जर उच्च न्यायालयाने एका दिवसात ३०० प्रकरणे निकाली काढली तर ६०० नवीन प्रकरणे सुनावणीसाठी येतात, असेही ते म्हणाले.

निकाली काढण्याचे प्रमाण वाढले
न्यायालयांमध्ये खटले निकाली काढण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, हे बारकाईने समजून घेण्याची गरज आहे. न्यायालयांमधील खटले निकाली काढण्याचे प्रमाण वाढले असून तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे खटले जलदगतीने निकाली निघण्यास मदत होत आहे, परंतु प्रलंबित प्रकरणांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे ती च्ािंताजनक आहे, असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या