24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयदेशात पहिल्यांदाच ३ फुटाच्या व्यक्तीला मिळाले ड्रायव्हिंग लायसन्स

देशात पहिल्यांदाच ३ फुटाच्या व्यक्तीला मिळाले ड्रायव्हिंग लायसन्स

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आपल्या देशात कोणतंही वाहन चालवण्यासाठी लायसन्स आवश्यक असते. लायसन्स मिळवण्यासाठी भारत सरकारने वयासह इतर काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. देशात पहिल्यांदाच एका तीन फुटाच्या व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले आहे. गट्टीपल्ली शिवलाल हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणारे देशातले पहिले सर्वात कमी उंचीचे व्यक्ती ठरले आहेत.

केवळ तीन फूट उंच असलेल्या कुकटपल्ली येथील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय शिवलाल यांना वाहन चालवायला शिकताना त्यांना अनेक अडचणी येत होत्या. पण एकदा त्यांनी अमेरिकेतील एका ठेंगण्या व्यक्तीचा गाडी चालवताना व्हिडीओ पाहिला आणि त्यांचा आत्मविश्वास बळावला.

देशात त्यांनी अनेक ठिकाणी ड्रायव्हिंग शिकण्यासाठी अर्ज केले. मात्र त्यांना सर्वांनी नकार दिला. त्यामुळे गाडी चालवण्याचे संपूर्ण तंत्रज्ञान शिकण्यासाठी त्यांनी अमेरिकेचा प्रवास केला. त्यानंतर हैदराबादमध्ये कस्टम कारचे डिझाइन करणा-या एका व्यक्तीबाबत त्यांना माहिती मिळाली. या व्यक्तीकडून त्यांनी कारमध्ये काही बदल करून घेतले. या कारमधली पेडल्स नेहमीपेक्षा उंचावर होती आणि माझे पाय तिथपर्यंत पोहोचू शकत होते, असे शिवलाल यांनी सांगितले.

अनेक ठिकाणी विक्रमाची नोंद
शिवलाल आता आपल्या पत्नीला कार चालवायला शिकवत आहे आणि अधिक ठेंगण्या लोकांना स्वतंत्र बनण्यास मदत करण्यासाठी शहरात एक विशेष ड्रायव्हिंग स्कूल उघडण्याची त्याची योजना आहे. विनागीअर्सच्या त्याच्या स्वयंचलित वाहनाला तेलंगणा सरकारनेदेखील मान्यता दिली आहे. कमी उंची असलेल्या व्यक्तींच्या गटात प्रथमच ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्याने तेलुगू बुक ऑफ रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये शिवलाल यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या