24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयदेशात २७ हजार नवे रुग्ण

देशात २७ हजार नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये चढ-उतार सुरुच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशामध्ये २६,९६४ नव्या रुग्णांची भर पडली असून, ३८३ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांत देशात ३४,१६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी सोमवारी देशात २६,११५ रुग्णांची भर पडली होती.

केरळमध्ये मंगळवारी १५,७६८ जणांना कोरोनाची लागण झाली असून २१४ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही एक लाख ६१ हजार १९५ इतकी आहे. राज्यात काल ३,१३१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ४४ हजार ७४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के आहे. राज्यात काल ७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या