36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयदेशात ३ लाख ३७ हजार नवे रुग्ण

देशात ३ लाख ३७ हजार नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरात कोरोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे. देशभरात मागील २४ तासांत ३ लाख ३७ हजार ७०४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ४८८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आज आढळलेली कोरोनाबाधितांची संख्या कालच्या पेक्षा ९ हजार ५५० रुग्णांनी कमी आहे, तर २ लाख ४२ हजार ६७६ जण कोरोनामधून बरेदेखील झाले आहेत.

मात्र, नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनातून मुक्त होणा-या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे नव्या सक्रीय रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे ओमिक्रॉनचे रुग्णदेखील मोठ्या संख्येने वाढत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या