26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयदोन वर्षांवरील मुलांसाठी लवकरच लस मिळणार

दोन वर्षांवरील मुलांसाठी लवकरच लस मिळणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : २ वर्षांवरील मुलांसाठी लवकरच कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकते. या वयाच्या मुलांसाठी कोवॅक्सिन सुरक्षित असल्याचे चाचणीतून समोर आले आहे. कोवॅक्सिन लस तयार करणा-या भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन मुलांसाठी सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कोवॅक्सिन लस दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी सुरक्षित आहे. कोवॅक्सिन लस मुलांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास सफल ठरली. कोवॅक्सिन लसीच्या चाचणीचा अहवाल लँसेट इंफेक्शिअस डिसिजेस पत्रिकेत प्रकाशित झाला आहे. भारत बायोटेक कंपनीने ५ लाख लसीचे डोस असल्याचा दावाही केला आहे. गरज पडल्यास हे डोस तात्काळ पुरवण्यात येईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

भारत बायोटेक कंपनीने गेल्या वर्षी जून २०२१ पासून सप्टेंबर २०२१ दरम्यान २ ते १८ वर्षे वयांच्या मुलांवर दुस-या आणि तिस-या टप्प्यातील चाचणी केली होती. २ ते १८ वयोगटातील मुलांना लस किती सुरक्षित आहे, रोग प्रतिकारकशक्ती वाढते का, यावर या अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये लस सुरक्षित असल्याचा निष्कर्ष निघाल्याचा दावा कंपनीने केला आहे. कोवॅक्सिन लसीचा आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या