26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका

धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त आहे. त्यांना तातडीने ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंडे यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ब्रिच कँडी रुग्णालयात जात मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे यांना सायंकाळच्या सुमारास छातीत वेदना जाणवू लागल्याची माहिती समोर आली. धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ब्रीच कॅन्डी रुग्णालयात गेले होते. टोपे यांनी मुंडे यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या