26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeक्रीडाधावा कर आणि संघाला पुढे ने

धावा कर आणि संघाला पुढे ने

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ गुरुवारपासून न्यूझिलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजला सुरुवात करणार आहे. पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाची कमान अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असणार आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाचा माजी क्रिकेटर हरभजनसिंगने अजिंक्य रहाणेला गंभीर इशारा दिला आहे.
अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाच्या मध्यक्रमातील सर्वोत्तम फलंदाज आहे.

परंतु, गेल्या काही महिन्यांपासून तो मोठी खेळी करण्यास अपयशी ठरत आहे. त्याने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौ-यावर शतक झळकावले होते, तर यावर्षी त्याला केवळ २ अर्धशतक झळकवण्यात यश आले आहे. त्याने या वर्षी १९ डावांत १९.५८ च्या सरासरीने ३७२ धावा केल्या आहेत.

रहाणेच्या खराब खेळीवर हरभजनने भाष्य केले आहे. ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रहाणे होता. तो संघातील आपले स्थान वाचवू शकेल की नाही याबद्दल आम्हाला शंका होती. पण पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्याच्या शेवटच्या ११ सामन्यांवर नजर टाकली तर त्याची सरासरी फक्त १९ आहे. तो एक हुशार क्रिकेटपटू आहे. पण त्याची अलीकडची कामगिरी याची खात्री देत ​​नाही.

रोहित, विराट आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाही विचार चांगला आहे की त्यांनी रहाणेवर विश्वास ठेवला की तो संघात असावा. तसेच रहाणे धावा करेल आणि संघाला पुढे नेईल, अशी आशा असल्याचे हरभजनने म्हटले आहे. तो म्हणाला, ‘‘त्याला कर्णधारपद देण्यात आले आहे. मला आशा आहे की तो संघाला पुढे नेईल आणि बॅटची जादू दाखवेल. असे सांगत, रहाणेने धावा केल्या नाहीत तर अनेक खेळाडू त्याच्या मागे रांगेत उभे आहेत. रांग खूप लांब आहे. सूर्यकुमार यादवही रांगेत थांबला आहे. असा गंभीर इशारा हरभजनने रहाणेला दिला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या