21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयनक्वींचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

नक्वींचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

एकमत ऑनलाईन

आरपी सिंह यांनीही मंत्रिपद सोडले
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील मुख्तार अब्बास नक्वी व रामचंद्र प्रसाद उर्फ आरपी सिंह यांनी आज केंद्रीय मंत्रिपदांचे राजीनामे दिले. दोघांचाही राज्यसभा कालावधी उद्या संपत आहे. पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दोघांच्याही विशेषत: नक्वी यांच्या कामाबद्दल प्रशंसोद्गार काढले. यामुळे नक्वी यांना भाजप उपराष्ट्रपतीपदी संधी देणार असल्याची जोरदार चर्चा पुन्हा सुरू झाली.

अल्पसंख्याक विभागाची धुरा सांभाळणा-या नक्वी यांचा राज्यसभेतील खासदारकीचा कार्यकाळ संपल्याने आदल्याच दिवशी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्वींच्या योगदानाचे कौतुक केले. भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवारी यादीतून नक्वींचे नाव वगळण्यात आले होते. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना केंद्रीय मंत्री केवळ ६ महिन्यांच्या कालावधीसाठी कामकाज पाहू शकतात. मात्र, त्याआधीच नक्वींनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप नक्वी यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा होती. मात्र, ती प्रत्यक्षात उतरली नाही. त्यामुळे आता नक्वींना उपराष्ट्रपतीपदासाठी भाजप रिंगणात उतरवण्याची शक्यता वाढली आहे. भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने एनडीएचे उमेदवार म्हणून नक्वींना तिकीट मिळाल्यास यूपीएच्या तुलनेत त्यांचे पारडे जड ठरू शकते.

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या