28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयअमित शाह, ममता बॅनर्जी शिक्षक भरती परीक्षेतले गुणवंत

अमित शाह, ममता बॅनर्जी शिक्षक भरती परीक्षेतले गुणवंत

एकमत ऑनलाईन

कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सुवेंदू अधिकारी, दिलीप घोष या राजकारणातील धुरिणांनी पश्चिम बंगालमधील शिक्षक पात्रता परीक्षा गुणवत्तेसह उत्तीर्ण केल्याची माहिती मंगळवारी चव्हाट्यावर आली.

धक्का बसला असेल ना. पण ही नावे पश्चिम बंगालमध्ये २०१४ या वर्षी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या गुणवत्ता यादीत समाविष्ट असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम बंगालमध्ये टीईटी घोटाळा चर्चेत आला आहे. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात मोहिम उघडलेली असतानाच नव्याने चव्हाट्यावर आलेल्या या शिक्षक भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीमुळे आणखी संताप व्यक्त होत आहे.

या गुणवत्ता यादीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ९२ गुण मिळाले. तर, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना ९८ गुण मिळाले. पश्चिम बंगालचे विद्यमान विरोधी पक्षनेते आणि तत्कालीन तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांना १०० गुण मिळाले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सृजन चक्रवर्ती यांना ९९ गुण मिळाले

भाजपचे पश्चिम बंगालमधील नेते सुकांता मुझुमदार यांनी ट्विटरवरून पुराव्यासह ही गुणवत्ता यादी जाहिर केली. राज्य सरकार हा असला प्रकार कधी थांबवणार, असा टोलाही त्यांनी या ट्विटमधून लगावला.
विशेष म्हणजे या यादीत पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतम पाल यांच्या नावाचाही समावेश आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणा-या या यादीतील काही नावे ही पश्चिम बंगालमध्ये सामान्य आहेत. त्यामुळे यादीतील नावे सत्य आहेत की बोगस हे तपासण्याचे आव्हान यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या