26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeमहाराष्ट्रनारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर पालिकेचा हातोडा

नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर पालिकेचा हातोडा

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला. मुंबईच्या जुहू परिसरात असलेल्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान आता नारायण राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पडण्यास सुरवात झाली आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर बांगल्याचे पाडकाम करण्यात येत आहे. कोर्टाच्या आदेशानंतर राणेंकडूनच अनधिकृत बांधकामचे पाडकाम करण्यास सुरवात केली आहे.मुंबईत जुहू येथे नारायण राणे आठ मजली अधीश बंगला आहे. राणेंच्या अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार संतोष दौंडकर यांनी केली होती.

मंजूर झालेल्या आराखड्यापेक्षा तीन पट आधिक म्हणजे २२४४ चौरस फुट बांधकाम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. यासंबधी महापालिकेच्या ९ अधिका-यांच्या पथकाकडून २१ फेब्रुवारी रोजी बंगल्यात पाहणी केली होती.

कोर्टाच्या आदेशानंतर नारायण राणे यांनी त्यांच्या आधीश बंगल्यावरील अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटवायला सुरुवात केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात हे बांधकाम हटवले जाईल असं सांगण्यात आले होते. बंगल्यावर जो अनधिकृत भाग होता तो काढून नकाशा प्रमाणे नियमात बांधकाम ठेवले जाणार आहे. मुंबई महापालिकेने नारायण राणे यांच्या बंगल्याला नोटीस दिली होती त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या