26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिकच्या शिवसेना पदाधिका-यांवर धारदार शस्त्राने वार; उपचार सुरू

नाशिकच्या शिवसेना पदाधिका-यांवर धारदार शस्त्राने वार; उपचार सुरू

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिक शहरातील शिवसेना पदाधिका-यावर काल रात्रीच्या सुमारास एमजी रोडवर अज्ञात हल्लेखोराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

एकीकडे राज्यात शिवसेना व शिंदे सेना यांच्यात घमासान सुरू असताना नाशिकच्या शिवसेना पदाधिका-यांवर हल्ला झाल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शहरातील एमजी रोडवरील यशवंत व्यायामशाळेजवळ ही घटना घडली. काल रात्रीच्या सुमारास नाशिक विधानसभा प्रमुख निलेश ऊर्फ बाळा कोकणे हे दुचाकीवर असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात कोकणे हे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी झालेल्या कोकणे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास भद्रकाली पोलिस करीत आहेत. मात्र त्यांच्यावर हल्ला का झाला हे अद्याप समजू शकले नाही.

हल्ल्याचे कारण अस्पष्ट
दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर पलायन केले आहे. त्यामुळे हल्ला कुणी व का केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. घटना घडल्यानंतर स्थानिकांनी बाळा कोकणे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्ला का झाला याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी सेनेतील पडलेले दोन गट, अंतर्गत वाद यांचा काही संबंध या हल्ल्यामागे आहे का? याची पडताळणी पोलिस यंत्रणा करत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या