25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयनितीशकुमार नाराज, बिहारमध्ये उलथापालथ?

नितीशकुमार नाराज, बिहारमध्ये उलथापालथ?

एकमत ऑनलाईन

 केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूचा सहभाग नाही
पाटणा : बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंग यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. जेडीयूचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंग यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूचा समावेश होणार नसल्याचे जाहीर केले आहे. २०१९ मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत, असेही ते म्हणाले. दरम्यान, नितीशकुमार भाजपवर नाराज असून, त्यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याची शक्यता आहे.

माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह हे नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कसे सामील झाले हे तेच सांगू शकतील. २०२४ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याबाबत लालन सिंह म्हणाले की, येणारा काळ कोणी बघितला आहे. बिहारमध्ये एनडीएचा मित्र असल्याने भाजपने केंद्र सरकारमध्ये जेडीयूला मंत्रिपद दिले होते.

जेडीयूला मंत्रिपद देताना आरसीपी सिंह यांना केंद्रीय मंत्री केले होते. मात्र, आरसीपी सिंग यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा जेडीयूकडून वरिष्ठ सभागृहात पाठवण्यात आले नाही. याच कारणामुळे आरसीपी सिंह यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आरसीपी सिंह यांचे शरीर जेडीयूमध्ये आहे. मात्र, त्यांचे मन इतरत्र आहे, असेही लालन सिंह यांनी सांगितले.

आरसीपी सिंह यांचा
नितीशकुमारांवर आरोप
माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी जनता दलाचा राजीनामा देताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. माध्यमांशी बोलताना आरसीपी यांनी सांगितले की, नितीश कुमार सात जन्मातही पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. जेडीयू हे बुडणारे जहाज आहे. आता या पक्षात काहीच उरले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

नितीश यांचा सोनियांशी संवाद
जदयूचे प्रमुख नेते नितीशकुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती आहे. बिहारमधील जदयू आणि भाजपची युती तुटण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत जाहीर वक्तव्य करण्यात आलेले नाही. माजी केंद्रीय मंत्री आर. सीपी. सिंह यांच्यामुळे भाजप आणि जदयू यांच्यात तणाव वाढला आहे.

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या