22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयनिर्बंधा आधी नव्या विषाणूचा अधिक अभ्यास आवश्यक

निर्बंधा आधी नव्या विषाणूचा अधिक अभ्यास आवश्यक

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : दक्षिण आफ्रिकेतील देशांमधून होणा-या विमानसेवेवर निर्बंध लादण्याआधी नव्या कोरोना विषाणूची तपशीलवार माहिती आवश्यक असल्याचे मत अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फौची यांनी व्यक्त केले. त्यामुळे जगभरात नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काळजीचे वातावरण असले तरी अमेरिका सध्या तरी सावध भूमिका घेताना दिसत आहे. अद्याप अमेरिकेत या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आलेले नाही.

फौची म्हणाले, आम्हाला नव्या कोरोना विषाणूबाबत अधिक तपशील मिळतील तसे आम्ही यावर तातडीने निर्णय घेऊ. अशा गोष्टींवर चर्चा केली जाते. मात्र, शास्त्रीय कारणे समोर येईपर्यंत आम्ही काही निर्णय घेत आहे, असे म्हणता येत नाही. हा नवा कोरोना विषाणू अमेरिकेत अस्तित्वात असल्याचा कोणताही पुरावा नाही. या विषाणूच्या रचनेत बदल झाले आहेत. त्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे.

तसेच रोगप्रतिकारक शक्तीला भेदण्याचा धोका आणि संसर्ग वाढण्याबाबत भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, हे सर्व वैद्यकीय चाचण्यांनंतरच स्पष्ट होईल. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमिक्रोन हा नवा विषाणू सापडल्यानंतर ब्रिटन आणि युरोपीयन संघाने दक्षिण आफ्रिकेतून येणा-या विमानांवर निर्बंध घातलेत. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी देखील दक्षिण आफ्रिकेतील आपल्या समकक्ष शास्त्रज्ञांशी या विषयावर बैठक घेतली. यात दक्षिण आफ्रिकेत नेमकी काय स्थिती आहे, यावर चर्चा करण्यात आली.

इस्राईलमध्ये नव्या विषाणूचा संसर्ग झालेला रूग्ण मलावीमधून परतला होता. इस्राईलमध्ये मलावीशिवाय इतर देशांमधून परतलेल्या अन्य २ प्रवाशांमध्ये देखील या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग आढळला आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाची लागण
विशेष म्हणजे इस्राईलमध्ये संसर्ग झालेले तीनही रूग्णांचे लसीकरण झालेले होते. यानंतरही नव्या कोरोना व्हेरिएंटचा संसर्ग झाला. त्यामुळे या व्हेरिएंटने इस्राईलसह जगभरातील आरोग्य यंत्रणेची काळजी वाढवली. असे असले तरी इस्राईलमधील या संसर्गित रूग्णांचे लसीकरणाचे किती डोस झाले होते. याची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

अनेक पटीने घातक विषाणू
याआधी जगभरात धोकादायक समजल्या गेलेल्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अनेक पटीने हा नवा व्हेरिएंट घातक असल्याचे समोर येत आहे. डेल्टा व्हेरिएंटमध्ये दोन म्युटेशन झाले होते. मात्र, या व्हेरिएंटमध्ये तब्बल १० म्युटेशन झालेले आहे. त्यामुळे याची संसर्ग क्षमता वाढली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या