22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयनीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. कुमार यांचा राजीनामा

नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. कुमार यांचा राजीनामा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : डॉ. राजीव कुमार यांनी नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. डॉक्टर राजीव कुमार यांनी जवळपास ५ वर्ष उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. राजीव कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर डॉ. सुमन के बेरी यांची नीती आयोग उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार नीती आयोगाचे दुसरे उपाध्यक्ष होते.

२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने योजना आयोगाचे नाव बदलून नीती आयोग केले होते. त्यानंतर अरविंद पनगढिया नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष राहिले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजीव कुमार यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. पनगढिया यांनी राजीमाना दिल्यानंतर १ सप्टेंबर २०१७ रोजी राजीव कुमार नीती आयोगाचे दुसरे उपाध्यक्ष झाले होते. नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. राजीव कुमार याआधी फिक्कीचे महासचिव होते. १९९५ ते २००५ पर्यंत त्यांनी आशियाई डेव्हलपमेंट बँकचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले होते. १९९२ ते १९९५ दरम्यान ते अर्थ मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार होते. ७० वर्षीय राजीव कुमार यांनी लखनौ विद्यापीठातून अर्थशास्त्रामधून पीएचडी आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठातून डीफिल केले आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या