16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयनीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार ५०० कोटी रुपयांचा चूना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग बुधवारी मोकळा झाला. नीरवला भारताकडे सोपवण्याचा निर्णय अन्यायकारक नाही आणि तो दबाव म्हणूनही घेतला जाऊ नये, असे लंडन येथील न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे निरवला भारताच्या स्वाधिन करण्याची शक्यता वाढली आहे.

नीरवला परत आणण्यासाठी भारतीय एजन्सींनी सरकारी आणि कायदेशीर पातळीवर अपील दाखल केले होते. यामध्ये नीरवने भारताच्या बँंिकग व्यवस्थेशी फसवणूक केल्याचे म्हटले होते. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याला भारतीय एजन्सींच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली होती.

लंडनमध्ये ऐशारामात जगणा-या नीरव मोदीने भारतीय कायद्याला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्याने भारतातील तुरुंगांची स्थिती पाहता आपल्या जीवाला धोका असल्याचा कांगावा केला होता. त्यावर भारताने लंडन न्यायालयास संपूर्ण माहिती सादर केली होती. नीरव फक्त पळून जाण्याचा मार्ग शोधत आहे, असा युक्तिवाद भारताने केला होता.

वेस्टमिनिस्ट कोर्टाकडून प्रत्यार्पण परवानगी

नीरव मोदी आणि मेहुल चौकसीने पंजाब नॅशनल बँकेची १४ हजार ५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. फेब्रुवारीमध्ये ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने मोदीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. त्याला निरवने लंडन उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मला भारतीय पोलिसांच्या ताब्यात दिल्यास मी वाचू शकणार नाही, असे निरवचे म्हणणे आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या