18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयनेपाळमध्ये बस नदीत कोसळून २८ प्रवाशांचा मृत्यू

नेपाळमध्ये बस नदीत कोसळून २८ प्रवाशांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

काठमांडू : नेपाळच्या मुगु जिल्ह्यात आज मोठा अपघात झाला. बस अपघातात कमीत कमी २८ जणांचा मृत्यू झाला. तर १६ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, नेपाळगंजहून मुगु जिल्ह्याचे मुख्यालय गमगाधीला ही बस जात होती. यावेळी पिना झयारी नदीमध्ये ही बस कोसळली.

बसमधील प्रवासी दुर्गा पुजेनिमित्ताने आपल्या घरी परतत होते. सुरखेतहून नेपाळी सैन्याचे हेलिकॉप्टर मदतीसाठी पोहोचले आहे. मुगु हे काठमांडूहून ६५० किमी उत्तर पश्चिमेकडे रारा तलावासाठी प्रसिद्ध असे ठिकाण आहे. बसमध्ये एकूण ४२ प्रवासी होते. मुगुच्या मुख्य जिल्हाधिका-यांनी सांगितले की, २४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जणांचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. बस कर्मचा-यांसह ४२ प्रवासी होते.

जखमींपैकी १४ जणांना हेलिकॉप्टरद्वारे नेपाळगंजला हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये अधिकांश लोक हे विद्यार्थी आणि मजूर आहेत. हे सारे सणासाठी भारतातून परतले होते. जिल्हाधिकारी महत यांनी सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये बसचा टायर फुटल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस मोठ्या उंचीवरून दरीमध्ये घसरत नदीमध्ये पडली. सोमवारी कास्की जिल्ह्यामध्ये जीप अपघातात आठ लोकांचा मृत्यू झाला होता.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या