24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयनेपाळही आर्थिक दिवाळखोरीत?

नेपाळही आर्थिक दिवाळखोरीत?

एकमत ऑनलाईन

काठमांडू : श्रीलंकेसारखी आर्थिक दिवाळखोरी ही भारताशेजारी राष्ट्रावर म्हणजेच नेपाळवर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नेपाळ सरकारकडून आर्थिक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या नादाला लागलेले देश दिवाळखोरीत निघत आहेत. त्यामध्ये मागील काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये असेच आर्थिक संकट आले आहे. त्यानंतर श्रीलंका जेरीस आला. आता चीनच्या नादाला लागणारा तिसरा देश म्हणजे नेपाळदेखील कंगाल झालेला असून, तोही दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे.

नेपाळमधील वाढत असलेल्या आर्थिक तंगीमुळे तेथील राष्ट्रीय बँकेने मोठे निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. अगोदरच नेपाळमध्ये इंधन पुरवठा भारतातून होतो. तरीसुद्धा तेथे पेट्रोल, डिझेल भारतापेक्षा स्वस्त आहे. राष्ट्रीय बँकने पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर नियंत्रण आणण्यास अर्थ मंत्रालयाला सांगितले आहे. त्याचबरोबर बँंकांना असेही सांगितले आहे की, उगाचच कुणाला कर्ज देण्यास बंदी घातलेली आहे.

नेपाळच्या राष्ट्रीय बँकेने २७ बॅँकांची बैठक घेतली, त्यामध्ये वाहन कर्ज आणि आवश्यकता नसलेले कर्ज देण्यात येऊ नये, असेही आदेश बँकांना दिले आहेत. आदेश दिलेल्या बँकांकडून सांगण्यात आले आहे की, नेपाळच्या अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी असे निर्णय घेण्यात आले आहेत. नेपाळ सरकारकडून दर महिन्याला पेट्रोलियम उत्पादनांसाठी भारताला २४-२९ अब्ज रुपये देते. परकीय चलनाच्या गंगाजळीत होणारी घसरण रोखण्यासाठी चैनीच्या वस्तूंच्या आयातीवरीव बंदी घातली आहे.

६-७ महिने पुरेल एवढीच परकीय गंगाजळी
सायकल, डिझाइन वाहने, मोपेड आणि अत्यावश्यक मोटर उपकरणे, तांदूळ, कापड उत्पादने, यंत्रसामग्री आणि सुटे भाग, सोने, तांदूळ, इलेक्ट्रिकल उपकरणे, तयार कपडे, चांदी आणि धागा यांच्या आयातीवर नेपाळ सरकारने बंदी घातली आहे. सिमेंट, खेळणी, जार, क्रीडा उत्पादने आणि संबंधित वस्तू, दगडी सजावटीचे साहित्य, चांदी, चांदीचे नक्षीकाम केलेले साहित्य, फायरप्लेसची भांडी, फर्निचर आणि संबंधित वस्तूंच्या आयातीसाठी लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) देखील उघडले जाणार नाही. म्हणजेच पुढील आदेश येईपर्यंत आयात प्रतिबंधित राहणार आहे. नेपाळच्या बँकेकडे पुढील ६-७ महिने पुरेल एवढीच परकीय गंगाजळी शिल्लक आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या