18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयनौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्याचा खात्मा

नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्याचा खात्मा

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नियंत्रण रेषेजवळ शनिवारी भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्याला कंठस्ना घातले. दहशतवाद्यांनी राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला.

शनिवारी पहाटे हे दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. सीमेवर प्रवेश करताच जवानांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पणाचा इशारा दिला. मात्र त्यांनी शरण येण्याऐवजी मागे पळत गोळीबार सुरू केला. यावेळी उडालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. या दहशतवाद्याचा मृतदेह सापडला असून त्याच्या मृतदेहाजवळ दारूगोळाही सापडला आहे. चकमक परिसरात लष्कराकडून अजूनही शोधमोहीम सुरू आहे.

घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दिगवार सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने घुसखोरी हाणून पाडताना ३ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. यावेळी दोन दहशतवादी फरार झाले असले तरी. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वी ३१ ऑक्टोबर ला लष्कराने कुपवाडा येथे घुसखोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले. त्यावेळी २ पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले. कर्नाह सेक्टरमध्ये २६ ऑक्टोबरला लष्करासोबत झालेल्या चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादीही मारला गेला.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या