24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयपरस्पर सहमतीने संबंध प्रस्थापित करणे दुष्कर्म नाही

परस्पर सहमतीने संबंध प्रस्थापित करणे दुष्कर्म नाही

एकमत ऑनलाईन

फतेहबाद : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बलात्काराच्या एका खटल्याची सुनावणी करताना आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश बलवंत सिंग यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाच्या मते परस्पर सहमतीने संबंध हा बलात्कार ठरू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. पीडित तरुणी अनेक महिन्यांपासून आरोपीच्या कॅन्टीनमध्ये काम करत होती. आरोपी विवाहित असतानाही त्याने लग्नाचे बहाणे दिल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले होते.

पीडितेने आरोपीचा दोष असल्याचे म्हणत तो विवाहित असून लग्नाचे आमिष दाखविल्याचा दावा केला. कोर्टाने या प्रकरणात महिलेला प्रतिप्रश्न केला. आरोपी विवाहित आहे की नाही, याची पूर्वकल्पना असतानाही महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी होकार दर्शविला. न्यायालयाने म्हटले की, पीडितेच्या वागण्यावरून असे दिसून येते की, तिचे आरोपीसोबत असणारे शारीरिक संबंध परस्पर सहमतीने होते. नंतर गुन्हा नोंदविण्यासाठी तिने ही कथा रचली. सर्वात महत्वाचे म्हणजे १५ जून २०१९ रोजी टोहाना पोलिसांनी गिलानवली धानी येथील रहिवासी असलेल्या दलीपविरुद्ध गुन्हा दाखल केला. संबंधित महिलेच्या तक्रारीवरून कलम ३१३, ३२८, ३७६, ५०६ आणि आयपीसीच्या एससी एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नोकरीच्या शोधात ती एका शाळेत गेली. याच वेळी तिची शाळेच्या कॅन्टीनचा ठेकेदार असणा-या दलीपशी भेट झाली. दलीपने तिला टोहाना शहरात भाड्याने खोली मिळवून दिली. एक दिवस दोघांचेही भेटण्याचे ठरले. त्याने ज्यूस आणला आणि तो प्यायल्यानंतर पीडिता बेशुद्ध झाली. यानंतर दलीपने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अनेक महिने तो तिच्यावर बलात्कार करत राहिला. ती गरोदर राहिल्यानंतर गर्भपात झाला. काही काळाने तिने लग्नासाठी विचारणा केली. मात्र, दलीपने आपण विवाहित असल्याचे सांगितले.

पत्नीचा जबाब आणि निर्दोष मुक्तता
कोर्टात महिलेच्या आरोपांना उत्तर देताना आरोपीची पत्नीही हजर झाली आणि तिने पीडितेला फ्रिज हप्त्यांवरर दिल्याचे आणि हप्तेही स्वत:च भरल्याचे सांगितले. दलीप विवाहित असल्याचे पीडितेला चांगलेच माहिती होते. ही महिला भाड्याने राहत असलेल्या घराच्या मालकानेही न्यायालयात साक्ष दिली. एकदा दलीप खोलीत आला होता. मात्र, यानंतर त्याने दलीपला पुन्हा तिथे पाहिले नाही.

पुरावे आरोप सिद्ध करण्यासाठी अपूरे
न्यायालयाने या खटल्यात महत्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. जेव्हा हे सिद्ध होते की पीडितेचे आरोपीसोबत संमतीने संबंध होते. तेव्हा वैद्यकीय पुरावे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पीडितेच्या अंतर्वस्त्रावर आरोपीचे वीर्य सापडले असले तरी बलात्कार झाल्याचे सिद्ध होत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या