26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeमहाराष्ट्रसदावर्ते अकोला पोलिसांच्या ताब्यात!

सदावर्ते अकोला पोलिसांच्या ताब्यात!

एकमत ऑनलाईन

अकोला : एसटी कर्मचा-यांची कोर्टात भूमिका मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात साता-यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना साता-यात सलग चार दिवस पोलिस कोठडीत राहावे लागले. त्यानंतर आज न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, आता फसवणूक प्रकरणी चौकशीसाठी सदावर्ते यांना अकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यास परवानगी मिळाली आहे. मंगळवारी यावर न्यायालय आदेश जारी करू शकते.

याआधी सदावर्ते यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ला प्रकरणात एसटी कर्मचा-यांना चिथावल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबईतील किला कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या सगळ््या घडामोडी घडत असताना राज्यातील इतर वेगवेगळ््या शहरांमध्येही सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मुंबई आणि साता-यातील जेलची हवा खाल्ल्यानंतर सदावर्ते यांना आता अकोला पोलिसांकडून अटक केली जाणार आहे. विशेष म्हणजे अकोल्याचे प्रकरण हे एसटी कर्मचा-यांची आर्थिक फसवणूक केल्याचे आहे. त्यामुळे हे प्रकरण सदावर्तेंच्या अडचणी वाढवू शकते.
अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणातील आरोपी गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अकोट न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाली असून अकोट न्यायालयाने सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी अकोट पोलिसांना परवानगी दिली आहे. या संदर्भात उद्या मंगळवारी अधिकृत आदेश निघणार आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडणींध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

अकोल्यात फसवणुकीची तक्रार
अकोल्यात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील व अन्य २ जणांविरुद्ध अकोट शहर पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेना कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोला शहर पोलस ठाण्यात तक्रार केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. या संपात सहभागी झाले. त्यावेळी कर्मचा-यांवर बडतर्फ आणि निलंबन, अशा अनेक कारवाया केल्या होत्या. या कारवायांपासून वाचण्यासाठी औरंगाबाद डेपोचे अजयकुमार गुजर, अकोट आगारातील प्रफुल्ल गावंडे यांच्यामार्फत गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी ७४ हजार ४०० रुपये अकोट शहरातील कर्मचा-यांचे स्वीकारले होते. तसेच राज्यभरातील एसटी कर्मचा-यांकडून ३ कोटी रुपये भूलथापा देऊन, कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ देणार नाही, असे खोटे आश्वासन देवून या चौघांनी कर्मचा-यांची फसवणूक केली आहे.

जयश्री पाटील यांची तुर्तास अटक टळली
सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना सहआरोपी करण्यात आले होते. मात्र, यानंतर जयश्री पाटील यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी त्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला. जयश्री पाटील यांना २९ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या