22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीयन्यायालयीन भरतीअभावी ५ कोटी खटले प्रलंबित

न्यायालयीन भरतीअभावी ५ कोटी खटले प्रलंबित

एकमत ऑनलाईन

जयपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची १८ वी बैठक राजस्थानातील जयपूर येथे पार पडली. यावेळी केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी देशात ५ कोटी न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी देशभरात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचे कारण सांगितले. न्यायालयीन भरती न केल्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित असल्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी केलेल्या भाषणात देशभरातील प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर न्यायालयीन भरती न केल्याच्या कारणावरून देशभरात पाच कोटी प्रकरणे प्रलंबित असल्याचे सरन्यायाधीश रमणा यांनी सांगितले. त्याचबरोबर सरकारला लवकरात लवकर न्यायालयीन भरती घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. प्रलंबित असलेल्या प्रकरणाला उत्तर देण्याची जबाबदारी ही कायदा मंत्र्यांची असल्याचे रमणा यांनी सांगितले.दरम्यान, लोकांना न्याय देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकार यांच्यात चांगला समन्वय पाहिजे, असे मत रिजिजू यांनी व्यक्त केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या