26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeक्रीडान्यूझिलंड चारी मुंड्या चीत

न्यूझिलंड चारी मुंड्या चीत

एकमत ऑनलाईन

भारताचा नवा कर्णधार रोहित शर्मा आणि नवा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पहिल्याच तीन सामन्यांच्यामालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले तर गत दौ-यात न्यूझिलंडमध्ये भारतीयानी त्यांचा ५-० ने टी२० सामन्यात पराभव केला होता आणि यावेळी तीन सामने सलग आठ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

ईडन गार्डन्स मैदानावर न्यूझिलंडविरुद्धच्या तिस-या टी-२० सामन्यात भारताने ७३ धावांनी विजय मिळवला. रोहितने सलग तिस-यांदा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने के एल राहुल आणि अश्विन ऐवजी ईशान किशन व युजवेंद्र चहल संधी यांना संधी दिली. तर न्यूझिलंडचा कर्णधार टीम साऊदी ऐवजी लॉकी फर्ग्युसन संघात आला कर्णधाराने ईडनवर मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक ठोकले.

रोहितच्या १६ धावाआणि शेवटी दीपक चहरने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २० षटकात ७ बाद १८४ धावा केल्या. केएल राहुलच्या जागी संधी मिळालेल्या इशान किशनसोबत रोहित शर्माने सलामी दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी फलकावर लावली. दोघांच्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करू लागला. पण कर्णधार मिचेल सेंटनरने सातव्या षटकात किशन(२९) आणि सूर्यकुमार यादव (०) यांना तंबूत धाडले. त्यानंतरआलेल्या ऋषभ पंतलाही (४) मोठी खेळी करता आली नाही.

प्रत्युत्तर देताना न्यूझिलंडचेफलंदाज १७.२ षटकात १११ धावांवर ढेपाळले. भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक ९ धावांत ३ बळी घेतले. तर हर्षलला २ बळी घेता आले. अक्षरला सामनावीर, तर रोहितला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. गेल्या दोन सामन्यात भारतीय संघाने टारगेट चेक केले होते त्यामुळे या वेळी कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी भेट सर्व खेळाडूंना फलंदाजीची संधी देण्याचा प्रयत्न केला मधली फळी नेहमीप्रमाणे अपयशी ठरल भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेल, मार्क चॅपमनआणि प्लेन फिलिप्स यांना पॉवरप्लेमध्ये बाद केले.

सलामीवीर मार्टिन गप्टिलने पुन्हा एकदा भारतासमोर प्रभावी ठरत अर्धशतक ठोकले. त्याने ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५१ धावा केल्या.आज संधी मिळालेल्या यजुवेंद्र चहलने ११व्या षटकात माघारीपाठवले. गप्टिलनंतर मात्र न्यूझिलंडचे इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या. १११ धावांवर न्यूझिलंडचा संघ गारद झाला. इशान किशनने दोन फलंदाजांना धावबाद करत त्याच्यातील क्षेत्ररक्षणाचे उत्कृष्ट गुण दाखवले. कानपूर येथे २५ तारखेला पहिली कसोटी सुरू होईल पण संघात नसलेल्या ईशान किशन आणि दीपक चहर या दोघांना भारतीय संघातून दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या