22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रपंडित हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

एकमत ऑनलाईन

गुरुबाबा औसेकर यांना कीर्तन, समाजप्रबोधन पुरस्कार,
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची घोषणा

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणा-या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज मंत्रालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेदरम्यान विविध पुरस्कार घोषित करीत असतानाच चित्रपट/नाटक/संगीत यांचे समीक्षण करणा-यांचाही सन्मान करण्याचा शासनाचा विचार असल्याचे सांगितले. दरम्यान, यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पं. हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच गुरुबाबा औसेकर महाराज यांना कीर्तन/प्रबोधनकार पुरस्कार जाहीर झाला.

महाराष्ट्रातील गायन/संगीत कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना देण्यात येणारा २०२१-२२ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पं. हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर करण्यात आला. शास्त्रीय संगीत क्षेत्रात गायन आणि वादनमध्ये प्रदीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना देण्यात येणारा २०२१-२२ चा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर झाला.

लोककलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणा-या कलाकाराला देण्यात येणारा २०१९-२० चा ज्येष्ठ कलाकारास विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार आतांबर शिरढोणकर यांना तर २०२०-२१ चा पुरस्कार संध्या माने यांना जाहीर करण्यात आला.

रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवा केलेल्या जेष्ठ नाट्य कलाकारास देण्यात येणारा २०२०-२१ चा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार दत्ता भगत यांना तर २०२१-२२ चा पुरस्कार सतीश आळेकर यांना जाहीर झाला. संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास देण्यात येणारा २०२०-२१ चा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार लता शिलेदार ऊर्फ दीप्ती भोगले यांना तर २०२१-२२ चा पुरस्कार सुधीर ठाकूर यांना जाहीर झाला. या पाचही पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

यासोबतच सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणा-या कलावंत व्यक्तींना सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप १ लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र आहे. नाटक क्षेत्रासाठी २०१९-२० साठी कुमार सोहोनी आणि २०२०-२१ साठी गंगाराम गवाणकर यांना पुरस्कार जाहीर झाला. कंठसंगीतसाठी २०१९-२० साठी पंडितकुमार सुरुसे आणि २०२०-२१ साठी कल्याणजी गायकवाड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. उपशास्त्रीय संगीतासाठी २०१९-२० साठी शौनक अभिषेकी आणि २०२०-२१ साठी देवकी पंडित यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

वाद्यसंगीत क्षेत्रासाठी २०१९-२० साठी सुभाष खरोटे आणि २०२०-२१ साठी ओमकार गुलवडी यांना, मराठी चित्रपटासाठी २०१९-२० साठी मधु कांबीकर आणि २०२०-२१ साठी वसंत इंगळे यांना पुरस्कार जाहीर झाला. कीर्तन/समाजप्रबोधनसाठी २०१९-२० साठी ज्ञानेश्वर वाबळे आणि २०२०-२१ साठी गुरुबाबा औसेकर यांना पुरस्कार जाहीर झाला. तमाशा क्षेत्रासाठी २०१९-२० साठी शिवाजी थोरात आणि २०२०-२१ साठी सुरेश काळे यांना पुरस्कार जाहीर झाला. शाहिरीसाठी २०१९-२० साठी शाहीर अवधुत विभुते आणि २०२०-२१ साठी कैलासवासी शाहीर कृष्णकांत जाधव यांना पुरस्कार जाहीर झाला.

नृत्य क्षेत्रासाठी २०१९-२० साठी शुभदा वराडकर आणि २०२०-२१ साठी जयश्री राजगोपालन यांना पुरस्कार जाहीर झाला. लोककलासाठी २०१९-२० साठी सरला नांदुलेकर आणि २०२०-२१ साठी कमलबाई शिंदे यांना पुरस्कार जाहीर झाला. आदिवासी गिरीजन क्षेत्रासाठी २०१९-२० साठी मोहन मेश्राम आणि २०२०-२१ साठी गणपत मसगे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. कलादान या क्षेत्रासाठी२०१९-२० साठी अन्वर कुरेशी आणि २०२०-२१ साठी देवेंद्र दोडके यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. हे पुरस्कार लवकरच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतील, असे अमित देशमुख यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या