तिरुवनंतपुरम : लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधानांच्या फोटोविरोधातील याचिका केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. पंतप्रधानांनी जनतेला दिलेला हा संदेश आहे, जाहिरात नाही, असे न्यायालयाने म्हटले. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती एस मणिकुमार आणि न्यायमूर्ती शाजी पी शाली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
त्यांना एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या आदेशात बदल करण्याचे किंवा याचिकाकर्त्याला लावण्यात आलेला दंड कमी करण्याचे कोणतेही कारण सापडले नाही. यापूर्वी २१ डिसेंबर रोजी आरटीआय कार्यकर्त्यांमार्फत दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती.