25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयपंतप्रधानांच्या हस्ते गुजरातमध्ये १०८ फुटी हनुमान मूर्तीचे अनावरण

पंतप्रधानांच्या हस्ते गुजरातमध्ये १०८ फुटी हनुमान मूर्तीचे अनावरण

एकमत ऑनलाईन

मोरबी : देशभरात आज मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील मोरबी येथील भगवान हनुमानच्या १०८ फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. यावेळी त्यांनी जनतेला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान म्हणाले की, देशभरातील आणि जगभरातील हनुमान भक्त आणि रामभक्तांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. अशा प्रकारे देशातील चार वेगवेगळ्या ठिकाणी हनुमानजींच्या १०८ फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत आहे. आपण शिमल्यात अनेक वर्षांपासून असाच पुतळा पाहतो आणि आज आपण हा दुसरा पुतळा पाहत आहोत असेही ते म्हणाले. दक्षिणेतील रामेश्वरम आणि पश्चिम बंगालमध्ये आणखी २ मूर्ती बसवण्याचे काम सुरू आहे. हनुमान ही अशी शक्ती आहे ज्याने सर्व जंगलात राहणा-या प्रजाती आणि वन बांधवांना आदर देण्याचा अधिकार दिला आहे असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या