27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयपंतप्रधान २१ ला संबोधित करणार

पंतप्रधान २१ ला संबोधित करणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ एप्रिल रोजी शीख गुरु तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी माहिती दिली.

याचबरोबर पंतप्रधान मोदी एक विशेष नाणे आणि टपाल तिकीटही जारी करणार आहेत. यावेळी ४०० रागी शबद कीर्तन गातील. दिल्ली शीख गुरुव्दारा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हे प्रकाश पर्व थाटामाटात साजरे करण्याचा निर्णय अगोदरच पंतप्रधानांनी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या