26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रपटोलेंना मिळणार मंत्रिपद?

पटोलेंना मिळणार मंत्रिपद?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल अपेक्षित आहे. यात काँग्रेसच्या कोट्यातील एका कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्याला डच्चू देत दोन नवीन चेह-यांना संधी दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे. यासाठी हायकमांडचा हिरवा कंदील मिळावा, म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मंगळवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यानंतर राज्यातील अन्य प्रमुख नेतेही आज दिल्लीत पोहोचले आहेत. मंत्रिमंडळातील अपेक्षित बदल तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबतही पटोले व अन्य नेते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचे कळते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडण्याची शक्यता असतानाच अधिवेशनाआधी मंत्रिमंडळात फेरबदल होतील, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या आग्रहावरून हा फेरबदल होणार असून काँग्रेसच्या एका वरिष्ठ मंत्र्याला डच्चू देत त्याजागी नाना पटोले यांची वर्णी लावली जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी एका राज्यमंत्र्यालाही नारळ दिला जाईल, असे सांगण्यात येत असून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी दिली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

नाना पटोले यांना मंत्रिमंडळात संधी द्यायची असल्याने पक्षाकडून कोणत्यातरी एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला राजीनामा देण्यास सांगितले जाणार असून हा मंत्री विदर्भातीलच असेल, असे सांगण्यात येत आहे. याबाबत खुद्द पटोले आणि राज्यातील काँग्रेसचे अन्य प्रमुख नेते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असून बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद अद्याप रिक्तच आहे. हे पद काँग्रेसकडेच जाणार हे निश्चित आहे. त्यामुळेच काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीवारीत विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार निश्चित केला जाण्याचीही शक्यता आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या