लोहगाव : पती-पत्नीच्या वादातून पैठण तालुक्यातील ७४ जळगाव येथील सरकारी गायराण जंगलात कमरेच्या पट्ट्याने आठ ते दहा दिवसांपूर्वी झाडाला गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. दीपक भगवान साळुंके ( ४१, रा.मिलिंदनगर, वार्ड क्रमांक- १७, मेहकर, जि. बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, की लोहगाव- पैठण रस्त्यावरील ७४ जळगाव शिवारातील गट क्रमांक ५४ मधील ३४ एकरक्षेत्रातील सरकारी गायराणात काही तरी सडलेला वास रस्त्याने जाणारे गुराख्यांना आला. त्यानी जंगलात पाहणी केली असता एका झाडाला आठ ते दहा दिवसांपूर्वी कमरेचा पट्ट्याने गळफास घेऊन कुंजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसले.
ही माहिती पोलिस पाटील अनिता बोरूडे-क्षीरसागर यांना मिळताच बिडकीन पोलीस ठाण्यात खबर दिली. सायंकाळी हवालदार सोमनाथ तांगडे, संजुबन कदम, यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पंचनामा करताना त्याच्या खिशाच्या पाकिटात आधार कार्ड व सीमकार्ड सापडले. पंचनाम्यानंतर रात्री उशीरा नानासाहेब क्षीरसागर, सुनिल एरंडे, अशोक घाडगे, गौतम सोनवणे, नारायण सोनवणे, ज्ञानेश्वर जगधणे आदींच्या मदतीने मृतास बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी तात्काळ आधारकार्डच्या आधारे मेहकर पोलिसांच्या मदतीने नातेवाईकाचा शोध घेतला असता सदर मृत वाळुज औद्योगिक वसाहतीत पत्नीसोबत राहत असल्याचे समजले.