28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयपब्जीसारख्या २८ गेम्समध्ये मालवेअर

पब्जीसारख्या २८ गेम्समध्ये मालवेअर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – ऑनलाईन खेळल्या जाणा-या २८ गेम्सच्या माध्यमातून युजर्सची आर्थिक माहिती अर्थात डेटा हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. रॉब्लॉक्स, फिफा, पबजी आणि माईनक्राफ्टसारख्या लोकप्रिय गेम्सचा या २८ गेम्समध्ये समावेश आहे. या गेम्सच्या माध्यमातून मालवेअरद्वारे आर्थिक डेटा हॅक करण्यात आला आहे. जुन-जुलै २०२१ काळात सुमारे ९२ हजार फाईल्सद्वारे ३ लाख ८४ हजार युजर्सचा डेटा हॅक करण्यात आला आहे.

कॅस्परस्की संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षात रिलीज झालेल्या एल्डन ंिरग, हॅलो आणि रेसिडेंट एव्हिलचा देखील आक्रमणकर्त्यांनी सक्रियपणे गैरवापर केला आहे. या गेम्सच्या माध्यमाथून रेडलाइन मालवेअर पसरवण्यात आले आहे. रेडलाइन हे पासवर्ड चोरणारे सॉफ्टवेअर आहे, जे व्यक्तीच्या डिव्हाइसमधून पासवर्ड, सेव्ह केलेले बँक कार्ड तपशील, क्रिप्टोकरन्सी वॉलेट्स आणि श्ढठ सेवांसाठी क्रेडेन्शियल्स यांसारखा संवेदनशील डेटाची चोरी करते.

सायबर गुन्हेगार गेम खेळणा-या युजर्सवर हल्ला करण्यासाठी, त्यांचा क्रेडिट कार्ड डेटा आणि अगदी गेम खाती चोरण्यासाठी अधिकाधिक नवीन युक्त्या आणि साधने तयार करत आहेत, ज्यात महागड्या स्किन असू शकतात. ज्या नंतर विकल्या जातात. उदाहरणासाठी जगभरात प्रचंड प्रसिद्ध मिळवत असलेल्या ई-स्पोर्टसवर स्टाईक देखील टाकू शकतात, असं कॅस्परस्की येथील वरिष्ठ सुरक्षा संशोधक अँटोन व्ही. इव्हानोव्ह यांनी सांगितलं.

डाउनलोड करताना अनावश्यक प्रोग्राम्स आणि अ‍ॅडवेअरमध्ये संशोधकांना ट्रोजन स्पायस देखील आढळले आहे. जेकी कीबोर्डवर टाईप केलेला कोणताही डेटा ट्रॅक करण्यास आणि स्क्रीनशॉट घेण्यास सक्षम असे मालवेअर आहे.

सीएस-गो, पब्जी आणि वारफेससाठी इन-गेम स्टोअर्सच्या संपूर्ण इंटरफेसची नक्कल करून, स्कॅमर फसवी पृष्ठे तयार करतात, संभाव्य युजर्सला गेममध्ये विविध शस्त्रे आणि स्कील विनामूल्य प्रदान करतात. शिवाय भेटवस्तूचे आमीष दाखवून खेळाडूंना त्यांच्या फेसबुक किंवा ट्विटरसारख्या सोशल नेटवर्कींग साईटसचा लॉगीन डेटा प्रविष्ट करण्यास भाग पाडतात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या