नवी दिल्ली : देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात पुन्हा घट झाली आहे. ८ जुलै २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनसाठा ८.०६२ अब्ज डॉलरने घसरून ५८०.२५२ अब्ज डॉलर झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यासोबतच सोन्याच्या साठ्याचे मूल्य १.२३६ अब्ज डॉलरने घसरून ३९.१८६ अब्ज डॉलर झाले आहे.
यापूर्वी १ जुलै २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन ५.००८ अब्ज डॉलरने घसरून ५८८.३१४ अब्ज डॉलर झाले होते. आरबीआयच्या आकडेवारीनुसार २४ जून २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात चलन २.७३४ अब्ज डॉलरने वाढून ५९३.३२३ अब्ज डॉलर झाले. यापूर्वी १७ जून रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा ५.८७ अब्ज डॉलरने घसरून ५९०.५८८ अब्ज डॉलर झाला होता, तर १० जून २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात तो ४.५९९ अब्ज डॉलरने घसरून ५९६.४५८ अब्ज डॉलर झाला होता.