26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रपरबीर सिंग चंदीगढमध्येच

परबीर सिंग चंदीगढमध्येच

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईत दाखल गुन्ह्यामध्ये फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांचा पत्ता अखेर लागला आहे. परमबीर देश सोडून गेल्याचे व सध्या बेल्जियममध्ये असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, हे दावे खोटे ठरले आहेत. कारण परमबीर सिंग हे सध्या चंदिगढ येथे असल्याचे वृत्त समोर आले असून, ते लवकरच मुंबईत परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

परमबीर सिंग यांना मुंबईतील कोर्टाने कालच फरार घोषित केले आहे. गोरेगावमधील एका खंडणीवसुलीच्या प्रकरणात परमबीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून क्राइम ब्रँचने कोर्टात विनंती केली असता परमबीर यांना फरार घोषित करण्यात आले. त्यांच्या जुहू येथील फ्लॅटच्या दरवाजावर याबाबतच्या आदेशाची प्रत चिटकवण्यात आली आहे. परमबीर यांना ३० दिवसांत हजर राहण्यास सांगण्यात आले असून ते हजर झाले नाहीत, तर त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या २३१ दिवसांपासून नॉट रिचेबल असलेल्या परमबीर सिंग यांचा फोन आज सुरू झाला असून त्यांच्याशी संपर्कही झाला आहे.

परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मुंबई आणि ठाण्यात विविध पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात खंडणीवसुलीसह अनेक गंभीर आरोप आहेत. त्यामुळे अटकेची टांगती तलवार असली तरी सुप्रीम कोर्टाकडून त्यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळाले आहे.

कोर्टाच्या आदेशाचे पालन करणार
परमबीर सिंग हे सध्या चंदिगढमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका खाजगी वृत्त वाहिनीने थेट त्यांच्याशी संपर्क साधला असून, त्यांनी आपण लवकरच मुंबईत परतणार असल्याचे सांगितले. कोर्टाच्या आदेशाचे मी पालन करणार आहे. मी पोलिसांच्या तपासाला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या