29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeक्रीडापहिल्या डावात भारताच्या २२३ धावा

पहिल्या डावात भारताच्या २२३ धावा

एकमत ऑनलाईन

केप टाऊन : पुनरागमन कसे करायचे, याचा उत्तम वस्तुपाठ भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज दाखवून दिला. तिस-या सामन्यात संघात पुनरागमन करताना कोहली एकटा दक्षिण आफ्रिकेच्या संघाबरोबर भिडल्याचे यावेळी पाहायला मिळाले. कोहलीने यावेळी १२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७९ धावा फटकावल्या, त्यामुळेच भारताला पहिल्या डावात २२३ धावा करता आल्या.

विराटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल या दोन्ही सलामीवीरांना यावेळी चांगली सुरुवात करता आली नाही. राहुलने यावेळी १२ धावा केल्या आणि मयांकला १५ धावांवर समाधान मानावे लागले. त्यावेळी भारताची २ बाद ३३ अशी अवस्था झाली होती. दोन्ही सलामीवीर जरी लवकर बाद झाले असले तरी त्यानंतर कोहली आण चेतेश्वर पुजारा यांनी तिस-या विकेटसाठी दमदार भागीदारी रचली व संघाला सावरले. पण यावेळी पुजारा ४३ धावांवर बाद झाला आणी जोडी फुटली. त्यावेळी भारतााची ३ बाद ९५ अशा स्थिती झाली होती. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांना पुन्हा एकदा खेळपट्टीवर राहून मोठी खेळी साकरण्यात अपयश आले.

एकाबाजूने फलंदाज बाद होत असले तरी कोहली मात्र खेळपट्टीवर ठाम मांडून उभा होता. एकाबाजूने कोहली एकाकी किल्ला लढवत होता. गेल्या गोन वर्षांमध्ये कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नव्हते. त्यामुळे कोहली या सामन्यात शतक झळकावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण कोहलीला यावेळी १२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७९ धावा करता आल्या. तळाचे फलंदाज साथीला असताना कोहली मोठी फटकेबाजी करायला गेला आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने यावेळी कोहलीला बाद केले. संघात पुनरागमन करताना कोहली हा भारताकडून सर्वाधिक धावांची खेळी करणारा खेळाडू ठरला. या डावात अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत हे दोघे पुन्हा अपयशी ठरले. या दोघांनी जर विराटला चांगली साथ दिली असती तर त्याचे शतक पूर्ण होऊ शकले असते, पण तसे घडले मात्र नाही. त्यामुळे विराट पुन्हा एकदा शतकावाचून वंचित राहीला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या