22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयपांडे, परमबीर यांची सीबीआय चौकशी

पांडे, परमबीर यांची सीबीआय चौकशी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे व परबीरसिंग यांची सीबीआयने दिल्लीत ५ ते ६ तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही चौकशी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात करण्यात आली.

विशेष म्हणजे याआधी ईडीनेदेखील संजय पांडे यांची ८ तास चौकशी केली होती. ही चौकशी पांडे यांच्या कुटुंबाशी संबंधित आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील एकूण १८ कोटी रुपयांच्या विविध व्यवहारांबाबत होती. पांडे यांच्या कुटुंबाच्या कंपनीशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराबाबत ईडीदेखील तपास करत आहे. व्यवहाराच्या स्त्रोतासह हे व्यवहार कोणत्या कारणासाठी करण्यात आले होते, याबाबत तपास सुरू आहे.

१९८६ च्या तुकडीचे पोलिस अधिकारी असलेले पांडे हे ३० जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून सेवेतून निवृत्त झाले. पांडे यांनी २००१ साली पोलिस खात्यातील सेवेचा राजीनामा दिल्यानंतर आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान कंपनी सुरू केली होती. त्यावेळी तांत्रिक कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर राहावे लागले. त्यावेळी त्यांनी २००६ मध्ये कंपनीत आपल्या आईला आणि मुलाला संचालक केले. २०१० ते २०१५ या कालावधीत या कंपनीला एनएसई सव्­र्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरीक्षण करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. पण त्या काळात एनएनईमध्ये को-लोकेशन गैरव्यवहार झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या