29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाकचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी मोहंमद खुरासनी ठार

पाकचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी मोहंमद खुरासनी ठार

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानचा मोस्ट वाँंटेड दहशतवादी, तेहरिक तालिबान पाकिस्तान संघटनेचा प्रवक्ता कमांडर खालिद बटली ऊर्फ मोहंमद खुरासनी आज मारला गेला आहे. पाकिस्तान सीमेलगत असलेल्या अफगाणिस्तानच्या पूर्व नांगरहार प्रांतात मारला गेल्याचे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली. टीटीपीने पाकिस्तानात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. यात २०१४ रोजी सैनिक शाळेवरचा हल्ला सर्वात मोठा भीषण मानला जातो आणि त्यात दीडशेहून अधिक मुले मारली गेली होती.

पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिका-याने खुरासनी मारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या अधिका-यांनी अफगाणिस्तानात आणि सीमेवर खुरासनीची माहिती गोळा केली आणि त्याचा मागोवा घेतला. तो सापडताच ठार केले.
खुरासनीला कोणी मारले, याबाबतचा पाकिस्तानने खुलासा केलेला नाही. मोहंमद खुरासनी हा गिलगिट बाल्टिस्तानचा रहिवासी होता. तो २००७ मध्ये खैबर पख्तुनख्वा प्रांतात स्वात भागात एका कट्टरपंथीयात सामील झाला. तो दहशतवाद्यांचा म्होरक्या मुल्ला फजलुल्लाह याचा निकटवर्तीय बनला आणि पुढे तो टीटीपीचा प्रमुख बनला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या