26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeआंतरराष्ट्रीयपाकमध्ये महिला आमदाराचा अश्लील व्हीडीओ व्हायरल

पाकमध्ये महिला आमदाराचा अश्लील व्हीडीओ व्हायरल

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील एका महिला आमदाराचा कथित अश्लील व्हीडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हीडीओ व्हायरल केल्या प्रकरणी आणि धमकावल्याच्या गुन्ह्याखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ज्या महिला आमदाराचा व्हीडीओ व्हायरल झाला तिचे नाव सानिया आशिक असे आहे. सानिया यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. पाकमधील एआरव्हाय या वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार सानिया आशिक पाकिस्तानच्या मुस्लीम लीग नवाजच्या सदस्य आहेत.

त्या पंजाब प्रांतातील तक्षशिला येथील आमदार आहेत. नुकताच पाकिस्तानमध्ये एक अश्लील व्हीडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हायरल व्हीडीओ एका रुममध्ये शूट करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला नग्नावस्थेत दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये ही महिला आमदारच असल्याचा दावा केला जातोय. या महिला आमदाराच्या नावानेच हा व्हीडीओ व्हायरल होतोय. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर सानिया यांनी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या