26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeआंतरराष्ट्रीयपाकिस्तानची आर्थिक परिस्थिती गंभीर

पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती गंभीर

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : कर्जाचा वाढता बोजा व कमी कर वसूली यामुळे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून, सरकारकडे देश चालवण्यासाठी पैसेच नसल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे.

इस्लामाबादमध्ये साखर उद्योगाच्या एका कार्यक्रमात खान यांनी ही कबुली दिली. वाढे विदेशी कर्ज व कर वसूलीत होणारी घट हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनला असून आपल्याकडे देश चालवण्यासाठी पैसाच नाही ही मोठी समस्या आहे. त्यामुळे आपण अधिक कर्जाच्या चक्रात अडकून बसलो आहोत, असे खान यांनी या कार्यक्रमात म्हटले आहे. सरकारकडे पैसा नसल्याने विकासकामांसाठी खर्च करताच येत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी नागरिकांमध्ये कर भरण्याची प्रवृत्तीच राहिली नसून स्थानीय संसाधनांना उत्पन्नात परिवर्तित करण्यात यापुर्वीची सरकारे असफल राहिल्याचे खापर खान यांनी विरोधी पक्षांवर फोडले आहे. विरोधी पक्षांच्या सरकारांनी २००९ ते १८ दरम्यान मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे, ज्याची परतफेड करताना आम्हाला नाकीनउ येत असल्याचा आरोपही खान यांनी केला आहे.आधीच खान सरकारविरोधात विरोधकांनी जोरदार आघाडी उघडली असताना आता खान यांच्या विरोधकांवरील हल्ल्यानंतर आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या