कराची : वृत्तसंस्था
रसातळाला गेलेल्या पाकिस्तानच्या विकासाची जबाबदारी अल्लाहचीच आहे, असा अजब तर्क पाकिस्तानचे अर्थमंत्री इशक दार यांनी मांडल्याने देशातील स्थिती किती दयनीय झाल्याचे स्पष्ट होत आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेच असलेला पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात गुरफटले आहे. विद्यमान सत्ताधारी आणि विरोधक या आर्थिक अरिष्टातून मार्ग काढण्या एवजी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.
त्यात पाकिस्तानचे केंद्रीय अर्थमंत्री इशक दार यांनी आपले सरकार विकासासाठी सर्व प्रयत्न करत आहे. मात्र यातून मार्ग काढण्याची जबाबदारी अल्लाहची आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानमध्ये परकीय गंगाजळी आटण्याच्या मार्गावर आहे. रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला असून पाकिस्तानी रूपयाचा दर डॉलरच्या तुलनेत अभूतपूर्व असा घसरताना दिसत आहे.